बहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज

0

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘भारत’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कतरिना कैफ, सलमान खानच्या लूक नंतर आता भारत सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे.

या पोस्टरमध्ये सलमान खान मायनर्स कॅपमध्ये दिसत आहे. तर कतरिना कैफ व्हाईट शर्ट आणि खाकी पॅंट या फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. केसांचे कर्ल कतरिनाच्या लूकला वेगळेपणा देत असून यात कतरिना अतिशय हॉट दिसत आहे.

सलमान खान याने हे नवे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “आणि पुन्हा आमच्या जीवनात आली मॅडम सर.” त्याचबरोबर #BharatKaJunoon हा हॅशटॅग वापरत कतरिना कैफला सलमानने टॅग केले आहे.

यापूर्वी सिनेमाचे दोन पोस्टर समोर आले होते. त्यापैकी एकात सलमान खानचा वृद्ध अवतार तर एकात यंग लूक पाहायला मिळतो.

LEAVE A REPLY

*