रिलायन्स जगातील सर्वात मोठे ऑनलाइन-टू-ऑफलाईन प्लॅटफॉर्म तयार करणार – मुकेश अंबानी

0

भुवनेश्वर (यूएनआय): रिलायन्स जगातील सर्वात मोठी ऑनलाइन-टू-ऑफलाईन कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. देशातील तीन कोटी व्यापारी व लहान दुकानदारांना या द्वारे काम मिळणार आहे.

आम्ही सर्वात मोठ्या उद्योगांना तसेच उद्योजकांना सक्षम करण्याचे काम याद्वारे करण्यात येणार आहे असे प्रतिपादन अंबानी यांनी आज येथे ओडिशा कॉन्क्लेव या कार्यक्रमात केले. रिलायन्स आणि जिओ एकत्र आल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या जीवनात सुधारणा व्हायला सुरवात होईल. ओडिशाच्या लहान आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसायातही सुधारणा करतील, असेही ते म्हणाले.

भारतात जिओ आल्यापासून भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली. २ वर्षांपासून भारतीय ग्राहकांची वाढत्या संख्येमुळे जागतिक बाजारात भारत १५५ व्या स्थानावर पोहचला आहे. पुढील तीन वर्षात या यादीतील भारताचे स्थान उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले

ते पुढे म्हणाले कि, डिजिटल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याला एक मोठे कारण आहे. ते म्हणजे जग डिजिटल क्रांतीचा केंद्रबिंदू आहे. जगातील प्रत्येक गोष्ट डिजिटल होत चालली आहे. संगीत, चित्रपट, वाणिज्य, बँकिंग, कार, घरे, आरोग्यसेवा, शिक्षण या सर्व गोष्टी आपणास डिजिटल रूपात प्राप्त होताना दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेचे प्रत्येक कक्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान पूर्णपणे सामावलेले असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सध्या करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*