Type to search

हिट-चाट

थुकरट वाडीत राणादासह येणार पाठक बाई

Share

मुंबई : चला हवा येऊ द्या च्या मंचावर ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो ‘युवा डान्सिंग क्वीन’ची टीम सज्ज होणार आहे.

दरम्यान याभागात युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील स्पर्धक म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री एक हटके परफॉर्मन्स सादर करणार आहेत. हार्दिक जोशी, अक्षया देवधर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या उपस्थितीत थुकरट वाडीच्या विनोदवीरांनी एकच कल्ला केला. येत्या आठवड्यात हे विनोदवीर ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘नटरंग’ चित्रपटावर आधारित एक विनोदी स्किट सादर करणार आहेत.

ज्यामध्ये भाऊ कदम – राणा, श्रेया बुगडे – पाठक बाई यांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे हास्यकल्लोळ होणार आणि हे विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पडणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे हि धमाल पाहायला विसरू नका फक्त ‘चला हवा येऊ द्या – शेलिब्रिटी पॅटर्न’मध्ये सोमवार मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!