राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पूरग्रस्तांना दिलासा मिळणार
Share

मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोल्हापूर सांगली या ठिकाणी महापुराने थैमान घातले आहे. दरम्यान मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात आता पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती सक्यमेत या खाजगी हिमवं वेधशाळेने दिली आहे. तसेच यावेळी अनेक ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थिती कायम असून या ठिकाणी पूर ओसरत आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात येत आहे. दरम्यान आता पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याची माहिती वेधशाळेने वर्तविली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल. मात्र, अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असे स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची लाट आता कमजोर होत आहे, त्यामुळे मुंबईत पाऊस कमी होईल#MumbaiRains #MumbaiRainsLiveUpdates https://t.co/eQuRX4V4Kw
— Skymet Marathi (@SkymetMarathi) August 9, 2019
महाराष्ट्राबरॊबरच गुजरातराज्यातही पावसाचे प्रमाण कमी होणार असून या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर, केरळमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. छत्तीसगड, अंदमान-निकोबार बेटांवरही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचा स्कायमेटचा अंदाज आहे.
दरम्यान, कर्नाटक मधील आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातरा आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आदी ठिकाणी अद्यापही पाऊस आणि पूराचा मुक्काम कायम आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी, पूरस्थिती कायम आहे.