Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; पाच लाख रुपयांची मदत जाहीर

Share

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाड येथे पिंपरीपाडा परिसरात भिंत कोसळली असून यामध्ये अठरा जण मृत्युमुखी पडले आहेत. तर जखमींची संख्या अधिक असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली

दरम्यान या दुर्घटनेतील जखमींवर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून मातीच्या ढिगार्‍याखाली दबलेल्यांसाठी बचावकार्य करत आहे. जखमींवर शताब्दी रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून चोघांची स्थिती चिंताजनक आहे. दुर्घटनेत मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारने ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने मालाडप्रमाणेच कल्याण आणि पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहे. २ जुलैला मुंबईत यलो वॉर्निंग म्हणजेच अतिवृष्टीचा धोका असल्याने आवश्यकता असेल तेव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!