Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबईत परतीच्या पावसाचे जोरदार आगमन; वाहतूक विस्कळीत

Share

मुंबई : परतीच्या पावसाने शहरात आणि उपनगरात दमदार हजेरी लावली. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने कमला जाणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

दरम्यान सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर अधिक पाणी साचल्याने दादर ते कुर्ला रेल्वे वाहतूक मंदावली. तर पावसामुळे रस्ता अंधूक झाल्याने हा अपघात झाल्याची घटना घडली.

दरम्यान पुढील ४८ तासांत मुंबईसहा पालघर, ठाणे, रायगड, आणि रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबाग आदी ठिकाणी पावसाची संततधार अद्यापही सुरु असल्याने वाहुकीवर परिणाम झाला आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की, कोकणात २४ आणि २५ जुलै रोजी अतिवृष्टी होईल. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस असणार आहे. मराठवाडा विदर्भातही येत्या चार दिवसात पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!