Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

प्रो कबड्डी लीग 2019 : आजपासून रंगणार ‘ले पंगा’चा थरार

Share

मुंबई : क्रिकेटच्या थरारानंतर प्रो कबड्डी लीगच्या थराराला सुरवात होत आहे. यंदाच्या सातव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. मागील सहा हंगामातील खेळाने प्रेक्षकांना यंदाच्या सत्राची देखील उत्सुकता आहे. थोड्यात या हंगामातील पहिल्या सामन्याला सुरवात होणार आहे.

दरम्यान यू मुंबा आणि तेलगू टायटन्स यांच्यात पहिला सामना होत आहे. हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर हा सामना होईल. तर दुसऱया सामन्यात गतविजेता बेंगळूर बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पटना पायरेट्स हे दोन संघ आमनेसामने भिडणार आहेत.

पहिल्या सत्रांपेक्षा हे सत्र वेगळे असणार असून सामन्यात चुरस वाढवण्यासाठी यंदा साखळी फेरीत सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल. तसेच मंगळवारचा दिवस हा विश्रांतीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!