Type to search

हिट-चाट

लीप लॉक सिन मुळे सेन्सेशन गर्ल ‘प्रिया वारीअर’ पुन्हा व्हायरल

Share

मुंबई : एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन झालेली प्रिया प्रकाश पुन्हा एकदा नव्या लीप लॉक सीनमुळे व्हायरल झाली आहे. सदर व्हिडीओ हा चित्रपटातील गाण्याचा असून यामधील हा लव्हसीन आहे.

गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला आपल्या डोळ्यांच्या अदांनी अनेकांना घायाळ केल्यानंतर अभिनेत्री प्रिया प्रकाश एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झाली. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. कारण तिच्या आगामी चित्रपटातला लीप लॉक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

प्रिया प्रकाशच्या ओरु अदार लव्ह या आगामी चित्रपटातील गाण्याचे तेलुगू व्हर्जन रिलीज झाले आहे. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा तर आहेच, शिवाय एका किसिंग सीनचीही तेवढीच चर्चा आहे. या सीनमध्ये तिचा कोस्टार रोशन अब्दुल राउफने तिला किस केल्याचे दिसत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!