Type to search

हिट-चाट

‘स्ट्रीट डान्स ३’ चित्रपटाचे हटके पोस्टर रिलीज

Share

मुंबई : एबीसीडी २ चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरल्यानंतर आता लवकरच ‘स्ट्रीट डान्स ३’ चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरूण धवनची जोडी ‘एबीसीडी २’ नंतर एकत्र झळकणार आहे. वरूण आणि श्रद्धाची या चित्रपटातील खास झलक आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

वरूण आणि श्रद्धाशिवाय चित्रपटात प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. श्रद्धा आणि वरूणसोबतच प्रभूदेवाची खास झलकदेखील शेअर करण्यात आली आहे. वरूणने हे फोटो ‘देवा रे देवा आया प्रभूदेवा’ असे कॅप्शन देत शेअर केले आहेत.

डान्सवर आधारित हा चित्रपट असणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे. अमृतसरमध्ये काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एबीसीडी २’नंतर प्रभूदेवा आणि वरूणचा अफलातून डान्स पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!