Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

महाराष्ट्रानंतर लवकरच गोवा राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत

Share

मुंबई : ‘गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. गोव्यात नवी आघाडी निर्माण होत आहे, जशी ती महाराष्ट्रात झाली. लवकरच गोव्यातही राजकीय भूकंप पाहायला मिळेल’, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान नुकतीच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडी ठिक बसली असून आता आमचे लक्ष गोवा राज्याकडे आहे. लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होणार असून शिवसेना याबाबत पाऊल उचलणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

सध्या गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते परंतु भरजपणे सरकार स्थापन करीत काँग्रेसला डच्चू दिला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!