मुंबई पोलीसांमुळे आडले मैत्रेयचे घोडे

0
नाशिक| दि. २ प्रतिनिधी – बहूचर्चित मैत्रेय फसवणुकप्रकरणी मुंबई येथे संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलीसांनी न्यायालयातून घेतलेल्या हरकतीमुळे कंपनीचा जळगावमध्ये असलेल्या हॉटेलचा विक्री व्यवहार अडकला असल्याने यापोटी मिळणारी ९.५ कोटी रुपयांची रक्कम इस्क्रो खात्यावर जमा झालेली नाही. यामुळे नाशिक येथून इस्क्रो खात्यातून सुरू असलेली वाटप थांबली आहे.

कोटयवधी रूपयांच्या मैत्रेय फसवणूक प्रकरणी जुलै २०१६ मध्ये जिल्हा न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मागील सहा महिन्यात इस्क्रो खात्यातून आतापर्यंत पावने दहा हजार पेक्षा अधिक गुंतवणुकदारांना साडेआठ कोटीं रूपयांपेक्षा अधिक परतावा करण्यात आला आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाने मैत्रेय प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना इस्क्रो खात्याद्वारे रकमेचा परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल २६ जुलैला दिला होता. इस्क्रो खात्यावरील रक्कम प्राधान्यक्रमाने ठेवीदारांना देण्यासाठी चार सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या इस्क्रो खात्यावर मैत्रेयचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्धन परूळेकर यांनी प्रारंभी ६ कोटी ४१ लाख रूपये रक्कम जमा केली होती.

तर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २९ जुलैला समारंभपूर्वक प्राधान्यक्रमाने सदर रक्कम वाटपास सुरूवात करण्यात आली होती. या रकमेच्या प्राधान्यक्रम वाटपासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. दिड वर्षात आतापर्यंत २९ प्राधान्यक्रम याद्यांना न्यायालयाची मान्यता घेऊन ९ हजार ८१० गुंतवणुकदारांना साडेआठ कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे वाटप करण्यात आले आहे.
मात्र यानंतर सत्पाळकर यांनी इस्क्रो खात्यावर कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. जमा केलेल्या रकमेपैकी बहुतांश रक्कम वाटली गेल्याने उर्वरित गुंतवणूकदार आपले पैसे मिळतील का नाही याबाबत चिंतेने ग्रासले आहे. तर पोलीस प्रशासन इस्क्रो खात्यात पुन्हा पैसे टाकण्यासाठी सत्पाळकर याच्याकडे पाठपुरावा करत आहे.
या कंपनीेचे जळगाव येथील हॉटेल विक्रीतून येणारी ९.५ कोटी रूपयांची रक्कम डिसेंबर महिनाअखेर पर्यत इस्क्रो खात्यावर वर्ग होणार होती. परंतु दरम्यन मुंबई येथे मैत्रेयच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले. मुंबई पोलीसांनी न्यायलयातून हरकत दाखल करत मैत्रेयच्या सर्व व्यवहारांवर बंधन आनले असून मुंबई पोेलीसांच्या परवानगीशिवाय कोणते व्यवहार होऊ नयेत असे स्पष्ट केले आहे.

यामुळे कंपनीचा जळगाव ेयथील हॉटेलचा पुर्णत्वाकडे असलेला व्यवहार थांबला आहे. परिणामी तेव्हापासून इस्क्रो खात्यात कोणतीही रक्कम जमा झालेली नाही.

LEAVE A REPLY

*