Type to search

Featured सार्वमत

मुंबई पोलिसाची राहुरीत दबंगगिरी

Share

परप्रांतीय कंटेनर चालकास बेदम मारहाण

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी बसस्थानकासमोर नगर-मनमाड महामार्गावर एका परप्रांतीय वाहनचालकास कट लागल्याच्या कारणातून मी मुंबई पोलीस आहे, असे म्हणत बेदम मारहाण केली. मुंबईचे पोलीस राहुरीत येऊन दबंगगिरी करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ही घटना काल रविवारी घडली. या घटनेमुळे वाहनचालकांमधे खळबळ उडाली आहे. शिडी – शिंगणापूर देवस्थानच्या मध्यवर्ती असलेल्या राहुरी बसस्थानकासमोर नगरहून येणार्‍या व शिर्डीच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला एका चारचाकी वाहनचालकाने गाडी आडवी लावून अचानक त्यास पोलीसी दांड्याने जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्या परप्रांतीय चालकास काय झाले? हेही कळत नव्हते. संबंधित कंटेनरचालकाला खाली खेचत पुन्हा अमानुष मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी आजूबाजूला असलेल्या व्यापार्‍यांनी धाव घेत या परप्रांतिय चालकाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण मी मुंबईचा पोलीस आहे, असे म्हणत स्थानिक नागरिकांवरही दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी हिसका दाखविताच तो आपले वाहन घेऊन तेथून पसार झाला. या बसस्थानकासमोरील चौकात मोठी वर्दळ असल्याने येथे वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने राहुरी बसस्थानकावरच बेशिस्तपणे उभी करीत असल्याने अपघातात वाढ होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!