Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज्यघटनेत; न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

मुंबई : प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज्यघटनेत असून न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करतांना आपली भावना व्यक्त केली. ते यावेळी म्हटले कि, विविधतेतील एकतेचा मंत्र न्यायव्यवस्थेने जपला असून न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा एकमेकांना जोडण्याचा संदेश आहे. तर अगदी कठीण समस्यांचाही उत्तर संविधानाच्या चौकटीत राहून मिळते. त्यामुळे आजची तारीख महत्वाची असून देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासात हा सुवर्णक्षण म्हणून लिहला गेला आहे.

भारतीयांसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक नवीन सकाळ घेऊन आला असून त्यांनी यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवाना उद्याचा ईदच्याही शुभेच्छा या माध्यमातून दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!