Type to search

maharashtra मार्केट बझ

पेटीएम पेमेंट्स बँक बनली भारतातील पहिली नफा नोंदवणारी पेमेंट्स बँक

Share

मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (पीपीबीएल) आज आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण झाली असल्याची घोषणा केली. संचालनाच्या दुस-याच वर्षात नफा कमावणारी पीपीबीएल ही भारतातील पहिली पेमेंट्स बँक बनली आहे. कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १९ कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.

मार्च १९ मध्ये १९% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह पीपीबीएल मोबाइल बँकिंग व्यवहारांत आघाडीवर आहे. भारतातील एकूण मोबाइल बँकिंग व्यवहारांच्या सुमारे एक तृतीयांश व्यवहारांचे संचालन पीपीबीएलद्वारे केले जाते आणि वार्षिक ३ लाख कोटी रु. पेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांचे नोंद कंपनीद्वारे केली जाते.

देशातील एकूण डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत पाहील्यास पीपीबीएल ही भारतीय स्टेट बँकेच्या मागोमाग येणारी बँक आहे. भारतात जास्तत जास्त रुपे कार्ड जारी करणारी ही बँक आहे. पीपीबीएलने ४५ दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांना त्यांच्या खात्याची रुपे डेबिट कार्ड जारी केली आहेत. ही बँक व्यक्तींना, सोल प्रोप्रायटर्सना,एसएमइज आणि मोठ्या कॉर्पोरेट्सना शून्य बॅलन्स करंट खात्याची सुविधा देते, ज्यात पैसे भरण्यावर, काढण्यावर, व्यवहारांच्या संख्येवर व रकमेवर कोणतेही निर्बंध नाहीत.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार गुप्ता म्हणाले, “गेल्या वर्षात आमच्या बँकेची कामगिरी उत्कृष्ट होती आणि उत्तम निकालांसह हे वर्ष पूर्ण झाले आहे. संचालन सुरू केल्यानंतर केवळ दोनच वर्षात नफा जाहीर करणारी ही देशातील पहिली पेमेंट बँक बनली आहे. ग्राहकांनी आमच्या सेवेत दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले की, एप्रिल २०१९ मध्ये आमच्या बचत खात्यांमध्ये ५०० कोटी रु पेक्षा जास्त ठेवी आहेत म्हणजे ठेवींच्या बाबतीत आम्ही भारतातील सर्वात मोठी पेमेंट बँक ठरत आहोत.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये मासिक सेव्हिंग अकाऊंट पेमेंट २४००० कोटी रु पासून ४०००० कोटी रु. पर्यंत वाढवण्यासाठी आमच्या मंचावर आणखी उत्पादने आणि फीचर्स देण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतातील पसंतीची पेमेंट्स बँक म्हणून स्वतःला दृढपणे स्थापित केल्यानंतर आम्ही संपूर्ण बँकिंग उद्योगात डिजिटल व्यवहार करणारी आघाडीची बँक ठरलो आहोत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!