Type to search

Breaking News maharashtra मार्केट बझ मुख्य बातम्या

महिंद्रानंतर आता पारले कडून दहा हजार कर्मचारी कपात

Share

मुंबई : लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आणि गावापासून ते शहरापर्यत सर्वाना परिचित असलेले पारले जी बिस्कीटसध्या आर्थिक अडचणीत असून नुकतेच कंपनीने तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारतात मंदीचे पडसाद दिसू लागले आहेत. मंदीचा सर्वाधिक फटका भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये एकच खळबऴ उडाली आहे. मारुती सुझुकी, अशोक लेलँड, महिंद्रा आणि आता पार्ले जी कंपनीने उडी घेतली आहे. ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याने पारले कंपनी ८ ते दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. दरम्यान एका अर्थ वृत्तांनुसार कंपनीने सरकारकडे मागणी केली आहे की, १०० रुपये प्रति किलो किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीच्या बिस्किटांवरील वस्तू सेवा कर कमी करण्यात यावा.

सरकारने जर ही मागणी मान्य केली नाही तर, १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. कारण, विक्री घटल्याने कंपनीला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. आजही पार्ले जिचे प्रॉडक्ट ५ रुएयास विकले जाते. पार्ले प्रोडक्ट्सची विक्री १०००० कोटी रुपयांहून अधिक होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!