विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

0

मुंबई : काऊन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी) आणि निकी हिंगद आर्ट फाऊंडेशन (एनएचएएफ), रोटरी क्लब ऑफ मिडसिटी, डिस्ट्रिक्ट ३१४१ यांच्याकडून त्यांच्या ८व्या वार्षिक ऑनलाइन राष्ट्रीय स्तरावरील आंतरस्कूल चित्रकला स्पर्धा २०१९ची घोषणा करण्यात आली आहे. ‘पर्सेप्शन’ असं या स्पर्धेचं नाव असून या स्पर्धेसाठी देशभरातील विद्यार्थी आणि शाळांकडून ऑनलाइन चित्रकला स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी, असे विषय या कला स्पर्धेचे असतील.

स्पर्धक स्पर्धेच्या चार संकल्पनांपैकी कोणत्याही एका संकल्पनेवर किंवा चारही संकल्पनांवर त्यांची चित्रं सादर करू शकतात. त्यात माय वर्ल्ड (आदर्श जगाबद्दल माझी कल्पना), द राइट टू अ हेल्दी लाइफ (कॅन्सरबाबत जनजागृती), सेव्ह वॉटर (पाणी वाचवा) आणि सरिएलिस्टिक वर्ल्ड (अवास्तविक जगाची कल्पना) हे विषय आहेत. ही चित्रकृती कोणत्याही प्रकारच्या रंगांनी साकार करता येऊ शकेल. ही कलाकृती nhafworld@gmail.com किंवा nhafnationals@gmail.com या ईमेलवर ७ मे २०१९च्या आधी पाठवून द्यावी.

“कला ही आपला दृष्टिकोन, परंपरा आणि विचारांची निर्मिती असते. या आमच्या पुढाकारातून तरुण कलाकारांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी तसेच निरोगी जीवन जगण्याच्या हक्काबाबत त्यांना ज्ञान मिळावे, अशी आशा वाटते. आमची अशी भावना आहे की कला हा कलाकाराच्या बुद्धिपासून ते हृदयापर्यंत झालेला एक प्रवास आहे आणि ती त्याची अभिव्यक्तीची भाषा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनांतील संकल्पना आकलनानुसार मांडता याव्यात, या दृष्टीने या वर्षाची थीम तयार केली गेली आहे.,” असे एनएचएएफच्या संस्थापक निकी हिंगद यांनी सांगितले.

ही स्पर्धा दोन भागांत विभागलेली आहे. पहिल्या भागात एनएचएएफ स्पर्धकांकडून आलेल्या, त्यांच्या शाळेने अटेस्टेड केलेल्या त्यांची सर्व माहिती असलेल्या कलाकृती ई-मेलच्या माध्यमातून स्वीकारेल. दुसऱ्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या प्रवेशिकांबाबत संबंधित विद्यार्थ्यांना कळवले जाईल आणि त्यांच्या मूळ चित्रकृती कुरियरने मुंबईतील कार्यालयात कुरियरने मागवल्यानंतर विजयी कलाकृती निवडल्या जातील. सर्व निकाल १५ मे २०१९ पर्यंत प्रिंट आणि सोशल मीडियातून घोषित केले जातील. CFBP-NHAF’चे फेसबुक पेज website – www.nhaf.co.in वर याबाबत माहिती मिळेल.

स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या सर्व पेंटिंग्जमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी स्पर्धा होईल. सर्व प्रवेशिकांचं वयोगटानुसार चार गटांत विभाजन केले जाईल. यात ‘वेनी ए’ गटात ५ ते ७ वर्षांचा हा वयोगट, ‘वेनी बी’ गटात ८ ते १० वर्षांचा हा वयोगट, ‘विदी’ गटात ११ ते १३ वर्षांचा वयोगट तर ‘व्हिसी’ गटात १४ ते १७ हा वयोगट असेल.

सर्व पेंटिंग्ज शाळेकडून अटेस्ट करून घेतलेली असून त्यावर स्पर्धकाचे नाव, वय, स्पर्धेचा गट (वेनी ए, वेनी बी, विदी किंवा व्हिसी), विषय, पत्ता, संपर्कासाठी क्रमांक, ई-मेल आयडी, शाळेचे नाव, शाळेचा ई-मेल आयडी आणि विद्यार्थ्याच्या वयाचा पुरावा असणारे ओळखपत्र सोबत पाठवायचे आहे. सर्व प्रवेशिका सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टशी संबंधित तज्ज्ञ मंडळी परीक्षक विद्यार्थ्यांची कलाकृतीचा वेगळेपणा, अस्सलपणा तपासून त्यांना मानांकन दिले जाईल.

सर्व चार श्रेणींतील विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल आणि ‘आर्ट मेस्ट्रो’ ही पदवी एनएचएएफकडून दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थी तसेच एनजीओकडून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हाच पुरस्कार दिला जाईल.

अधिक माहितीसाठी 022-22812727 या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या काळात संपर्क साधता येईल किंवा अधिक माहितीसाठी एनएचएएफच्या फेसबुक अकाऊंटवर संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

*