Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

उल्हासनगर : हजार रुपयांच्या कपडे खरेदीवर एक किलो कांदा मोफत!

Share
उल्हासनगर : हजार रुपयांच्या कपडे खरेदीवर एक किलो कांदा मोफत! Latest News Mumbai One Kilo of Onion Free with the Purchase Clothes

मुंबई : मागील काही दिवसांत कांदा दारात वाडः झाली होती परंतु आवक वाढल्याने दरात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. तरी अनेक ठिकाणी कांदाभावाने नागरिक हैराण असतांना उल्हासनगर येथील एका कापड दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. १ हजार रुपयांच्या कपड्यांच्या खरेदीवर १ किलो कांदा फ्री अशी ऑफर या दुकानदाराने काढली आहे.

दरम्यान कांदा भावात घसरण झाली असली तरी किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दर आहे. परंतु मागील काही दिवसांत झालेली भाववाढ यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पळाले आहे. यावर नामी शक्कल लढवत उल्हासनगरच्या शितल हँडलूमचे मालक ललित शेवकानी यांनी ही योजना सुरू केली आहे. भाववाढीमुळे संतप्त असलेल्या महिला वर्गाला यामुळे दिलासा मिळत आहे.

या दुकानात ब्लँकेट, चादर, उशीचे कव्हर, पडदे, पाय पुसणी आदी गोष्टी मिळतात. या दुकानात महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे दुकान मालकाने एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक किलो कांदे मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल ४० किलो कांदे संपले, अशी माहिती ललित यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!