कुणाला चाकू मारला, तर मला अटक करायची नाही; असं का म्हणाली ही महिला

0

नाशिक, ता. १० : भाईंदर रेल्वे स्थानकावरचा हा प्रकार आहे. लोकलमध्ये प्रवास करताना एका माणसाने तरुणीला नको तिथे स्पर्श करत छेड काढली.

त्यावर आवाज उठविणाऱ्या मुंबईतील एका महिलेला रेल्वे पोलिस आणि पोलिसांकडून वाईट अनुभव आला. आम्हाला हेच उद्योग आहेत का? असे म्हणण्याबरोबरच पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही, अशी कैफियत तिने मांडली आहे.

त्यानंतर मग नर्स म्हणून काम करणाऱ्या या महिलेची बहिण भारती कवाणकर यांनी आपल्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडिओ टाकल्यावर तो अवघ्या काही तासातच व्हायरल झाला. तब्बल साडेपाच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. तर साडेसोळा हजार लोकांनी तो शेअर केला आहे.

पोलिसांनी आमची तक्रारी नोंदविली नाही, उद्या कुणी छेड काढली आणि मी जर त्या माणसाला चाकू मारला तर पोलिसांनाही मग मला अटक करू नये अशी संतप्त भावना ही महिला बोलून दाखवित आहे.

मुंबईत लोकल आणि बसने लाखो महिला रोज प्रवास करतात. त्यातील अनेकींना विकृत पुरुषांच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. मात्र त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर पोलिसही त्यांना साथ देतीलच असे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून खरंच मुली आणि महिला आपल्या देशात किती सुरक्षित हा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा उपस्थित होत आहे.

छायाचित्र : भारती कवाणकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरील व्हिडिओतून साभार

LEAVE A REPLY

*