Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्यातील शिक्षकांना दिलासा; २० टक्के अनुदान मिळणार

Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करत होते. दरम्यान या आंदोलनाला यश मिळाले असून विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना मिळणारे अनुदान २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांत शिक्षकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शाळांना ० टक्के अनुदान होतं त्या शाळांना २० टक्के, तर ज्या शाळांना २० टक्के अनुदान देण्यात येत होतं, त्या शाळांच्या अनुदानात आणखी २० टक्क्यांची वाढ करत ते अनुदान ४० टक्क्यांवर नेण्यात आले आहे.

मात्र, राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्षक खूश नसल्याचे शिक्षक संघटनांचे मत असून राज्य सरकारने यापूर्वी अनेकदा अशी अश्वासने दिली असल्याने आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला हा निर्णय लेखी स्वरुपात द्यावा. तसेच, आझाद मैदानात येऊन सरकारच्या प्रतिनिधीने आम्हाला या निर्णयाची माहिती द्यावी, अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!