मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार
Share

मुंबई : ‘मी.. उद्धव बाळासाहेब ठाकरे…शपथ घेतो की..’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आज (दि. २९ ) रोजी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान गुरुवारी (दि. २८) रोजी सायंकाळी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, छगन भुजबळ आणि जयंत पाटील तर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात, नितीन राऊत या मंत्र्यांनी शपथ घेतली.
या शपथविधीस देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शपथविधी पार पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आज (दि. २९) या सरकारचा पहिलाच दिवस असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून दुपारी एक वाजता पदभार स्वीकारणार आहेत.