Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

आयपीएल मध्ये पॉवर प्लेअर ‘हा’ नवा नियम लागू होणार

Share

मुंबई : २००८ मध्ये सुरु करण्यात आलेली टी २० लीग आयपीएल या स्पर्धेने आज केवळ भारतातच नाही तर जगभरात आपली लोकप्रियता निर्माण केलेली आहे. जसे आपण सिनेमा पाहण्यासाठी तिकीट काढून मनोरंजन करण्यासाठी जातो. अगदी तसेच आयपीएल ही एक सर्कस आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही.

आज या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज , कोलकाता नाईट रायडर्स , मुंबई इंडियन्स , सनराईझर्स हैद्राबाद , राजस्थान रॉयल्स , किंग्ज इलेव्हन पंजाब , आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या आठही संघाचे चाहते आपल्या आवडत्या संघाची म्याच असेल. त्याला संपूर्ण पाठिंबा दर्शवतात. स्टॅटेजीक टाइम आऊट , सुपर ओव्हर या नियमांमध्ये आता आणखी एक पॉवर प्लेअर या नव्या नियमाची भर पडण्याची शक्यता आहे .

स्टॅटेजिक टाइम आऊट संघ ६-९ षटकापर्यंत घेऊ शकतो. हा साधारण अडीच मिनिटांचा असतो या ब्रेक मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडू आपली पुढची रणनीती काय आहे. याची आपापल्या प्रशिक्षकांसोबत रणनीती तयार करतात सुपर ओव्हर म्हणजे समजा कोलकाता विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी लढत सुरु आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७८ धावा काढल्या प्रत्युत्तरात कोलकाता संघालाही २० षटकात ५ बाद १७८ धावा काढता आल्या आणि सामना टाय झाला. तर दोन्ही संघांना सुपर ओव्हर खेळावी लागते. या नियमात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जाते. फलंदाजी करण्यासाठी प्रत्येक संघ कोणतेही ३ खेळाडू फलंदाजीसाठी पाठवू शकतो. कोलकात्याने ६ चेंडूंमध्ये ११-० धावा मुंबईलाही ११-१ धावा काढता आल्या तर अश्यावेळी ज्या संघाने सर्वात जास्त चौकार मारले आहेत त्या संघाला विजयी घोषित केले जाते .

असा असेल पॉवर प्लेयरचा नवा नियम
बीसीसीआय आता आयपील चाहत्यांचा उत्साह अधिक वाढावा म्हणून आता पॉवर प्लेअर हा नवा नियम लागू करण्याचा विचारात आहे. प्रत्येक संघाचा कर्णधार ११ खेळाडूंच्या जागी १५ खेळाडू सामन्यात खेळवू शकतो. विकेट पडल्यास किंवा एक षटक पूर्ण झाल्यानंतर संघ आपला खेळाडू बदलू शकतो सय्यद मुस्ताक अली स्पर्धेत हा नियम लागू होऊ शकतो. अखेरच्या षटकात समजा कोलकात्याला विजयासाठी २० धावांची आवश्यकता आहे. पण संघाचा पॉवर हिटर आंद्रे रसेल दुखापतीमुळे ड्रेसिंगरुममध्ये बसलेला आहे. अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याची निवड झालेली नसतानाही त्याला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

दुसरीकडे मुंबईची गोलंदाजी सुरु आहे. आणि प्रतिस्स्पर्धी संघाला ९ धावांची आवश्यकता आहे. आणि हॅरी गेंनी ड्रेसिंगरुममध्ये बसलेला आहे. तर आशावेळी कोलकात्याच्या कर्णधार दिनेश कार्तिक अंतिम ११ मध्ये स्थान नसलेल्या संदीप वॉरिअरचा पॉवर प्लेयर म्हणून वापर करू शकतो.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!