Type to search

हिट-चाट

‘तानाजी’ चित्रपटात बदल करा, अन्यथा मला लक्ष घालावे लागेल : जितेंद्र आव्हाड

Share

मुंबई : नुकताच तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. परंतु काही गोष्टीवर आक्षेप घेत अनेकांनी याबाबत जाब विचारला आहे. तसेच यामध्ये बदल करावा असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला तानाजी द अनसंग वोरीयर चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश केल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मध्ये दिगदर्शक ओम राऊत यांना धारेवर धरले आहे. त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे कि ‘काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा

यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल’ अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सुनावले आहे. त्यामुळे आता या चित्रपटात काही बदल होतायत का? हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रदर्शित होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!