Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

अजित पवार यांच्या राजीनाम्याचं गुपित थोड्याच वेळात उलगडणार

Share

मुंबई : राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.२७) अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राज्यभरात चर्चांना उधाणा आले होते. दरम्यान आज शरद पवार यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक पार पडली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार उपस्थित होते. शरद पवार यांनी सांगितले कि, आम्ही बैठकीत राजकीय विषयाबरोबर घरातील काही प्रश्नांवरही चर्चा केली असल्याचे सांगितले. तसेच काळजी करण्याचे काही कारण नसून अजित पवार स्वतः याबाबत संध्याकाळी चार वाजता संवाद साधणार आहेत, असेही पवार म्हणाले.

दरम्यान अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी कशामुळे हा निर्णय घेतला, अद्याप या मागचे कारण समजू शकले नाही. राजीनामा दिल्यापासून अजित पवार यांचा फोन देखील बंद लागत होता. सकाळी झालेल्या बैठकीनंतर अजित पवार सायंकाळी माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!