मुंबई : राष्ट्रवादीचा रेलरोको दोन मिनिटातच संपला

0

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात केलेला रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला.

जितेंद्र आव्हाड सव्वा नऊच्या सुमारास कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी कळवा स्टेशनवर आले. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघ्या दोन मिनिटात ताब्यात घेऊन बाजूला केलं.

त्यामुळे एकही लोकल थांबून राहिली नाही. शिवाय लोकांचा खोळंबाही झाला नाही.

आव्हाडांनी रेलरोको करुन लोकांना त्रास देऊ नये, अशी भावना सोशल मीडियावर आणि रेल्वे सुरक्षा संघानेही व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

*