Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलिस कोठडी

Share

मुंबई : मुंबईच्या नायर हॉस्पिटल्समध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी हीच्या आत्महत्येला कारणीभूत असणार्‍या या तीन महिला सिनियर डॉक्टरर्स यांना अटकेनंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने भक्ती मेहेर, डॉ हेमा अहुजा, आणि डॉ अंकिता खंडेलवाल या तिन्ही महिला डॉक्टरांना ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. काल रात्रीपर्यंत दोघींना तर सकाळी अंकिता खंडेलवाल या महिला डॉक्टरला मुंबईमध्ये अटक झाली होती.

२६ वर्षीय पायल तडवीने २२ मे दिवशी सिनियर डॉक्टर्सकडून जातीवाचक शेरेबाजीला कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवल, असा आरोप तडवी कुटुंबीय आणि पायलच्या पतीने केला आहे. काल (दि. २८ मे) दिवशी तडवी समाज आणि तिच्या कुटुंबीयांनी नायर हॉस्पिटल परिसरात निषेध केला.

गेल्या बुधवारी डॉ. पायल तडवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या विरोधात अट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पायलने नायर वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात प्रवेश घेतल्यापासून तिचा छळ केला जात होता. अखेरीस याचा मानसिक त्रास झाल्यानं पायलनं आत्महत्येचं पाऊल उचललं. दरम्यान या घटनेनंतर तिघी महिला डॉक्टरांना आज ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!