Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या हिट-चाट

Video : मुंबईच्या डान्स ग्रुपचा अमेरिकेत बोलबाला; एकदा व्हिडीओ बघाच

Share

मुंबई : इंडियास गॉट टॅलेंट सारखे अमेरिकन गॉट टॅलेंट आजपासून सुरु होतंय. त्यानिमित्ताने आज (दि. २८) होणाऱ्या या शोच्या प्रीमियर पूर्वी, निर्मात्यांनी सोशल मिडीयावर मुंबई डान्स ग्रुप व्हि अनबीटेबल (V Unbeatable) च्या डान्स परफॉर्मन्सची एक झलक पेश केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीआयवर तुफान व्हायरल होत असून त्याला लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या द किंग या हिप हॉप ग्रुपने अमेरिकेमधील वर्ल्ड ऑफ डान्स हा रिअ‍ॅलिटी शो जिंकला. ही घटना ताजी असताना, मुंबईचा हा अनबिटेबल ग्रुप आपल्या कलेचा डंका अमेरिकेत वाजवताना दिसत आहे.

LEAK: V.Unbeatable – America's Got Talent

There’s a reason their name is V.Unbeatable!See for yourself on the season premiere of America's Got Talent, Tuesday 8/7c on NBC.

America's Got Talent यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २४ मे, २०१९

लोकप्रिय शो अमेरिका गॉट टॅलेंट पुन्हा एकदा दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी 28 मेपासून सुरु होत आहे. त्यामुळे आयोजकांनी हा व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसारित केला.

या या व्हिडिओमध्ये मुलांचा अफलातून डान्स पाहून शोचे जजही आश्चर्यचकित होऊन उभे राहतात आणि या ग्रुपसाठी टाळी वाजवताना दिसतात. व्हिडिओ शेअर करताना मेकर्सनी या ग्रुपची स्तुती केली आहे.

व्हि अनबीटेबल ग्रुपने ही जबरदस्त कामगिरी करण्यापूर्वी गणपती बाप्पा मोरयाचा जयजयरकार केला. त्यानंतर या ग्रुपने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या ‘मल्हारी’ या गाण्यावर नृत्य केले. त्यांच्या या परफॉर्मन्सला स्टॅडिंग ओव्हेएशन मिळाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!