Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

#MumbaiRains : ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’मध्ये दोन हजार प्रवाशी अडकले; एनडीआरएफचे बचावकार्य सुरू

Share

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ बदलापूरजवळ अडकून पडली आहे.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व वांगणी भागात तुफान पाऊस झाल्यामुळे पुराचे पाणी रेल्वे रुळवर आलं असून या दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली असून यामध्ये तब्बल २ हजार प्रवाशी अडकून पडले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर मुंबईतून एनडीआरएफच्या पाच टीम व पाच बोटी घटनास्थळी पोहचल्या असून आज सकाळी देखील ८ टीम गेल्या असून सोबत बचावकार्यासाठी ८ बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

#MumbaiRains : 'महालक्ष्मी एक्सप्रेस'मध्ये दोन हजार प्रवाशी अडकले; एनडीआरएफचे बचावकार्य सुरू

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' अडकून पडली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व वांगणी भागात तुफान पाऊस झाल्यामुळे पुराचे पाणी रेल्वे रुळवर आलं असून या दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली असून यामध्ये तब्बल २ हजार प्रवाशी अडकून पडले आहेत.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २६ जुलै, २०१९

तसेच या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी बदलापूर येथे ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी नदीच्या जवळच असल्यानं बचावकार्यात अडथळे येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!