Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत

Share

मुंबई :  शिवसेना गटनेतेपदी खासदार विनायक राऊत यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या नावाची निवड केली. विनायक राऊत हे शिवसेना पक्षातील जेष्ठ नेते असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी दिल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवीत होते. विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा पराभव करत विजय मिळविला.

दरम्यान यापूर्वी विनायक राऊत यांनी मुंबई महानगपालिकेत १९८५ ते १९९२ या काळात नगरसेवक पद सांभाळले होते. तसेच १९९९ मध्ये विधानसभा सदस्य आणि २०१२ रोजी विधान परिषदेचे सदस्यपदी विनायक राऊत यांना निवडणूक देण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!