Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

दोन हजाराचा चेक पाठवून डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध

Share

मुंबई : भाजपचे कमळ चालत नसेल तर दोन हजार रुपये परत करा असे वक्तव्य करणाऱ्या सुजय विखे यांना एका तरुण शेतकऱ्याने दोन हजार रुपयांचा चेक पाठवून प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे यांनी कारंजाच्या येथील सभेत बोलतांना सांगितले होते कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’. यावर एका तरुण शेतकऱ्याने चक पाठवून सोबत पत्रही लिहले आहे. त्यात म्हटले आहे कि, डॉ. सुजय विखे यांनी असे विधान करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, आमच्या मताची किंमत दोन हजार रुपये ठरविणाऱ्या विखेंचा निषेध म्हणून आम्ही दोन हजार रुपयांचा चेक पाठवून आवाहन केले आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करू नये, सर्व शेतकऱ्यांनी या विधानाचा विचार करून मतदान करावे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे या चेकची चर्चा सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!