मुंबई : मोनोरेलच्या दोन डब्यांना आग

0

पहाटे पाचच्या सुमारास मुंबईच्या वडाळा येथील म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग लागली.

या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवण्यात यश आले.

यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

वडाळ्याहून चेंबूरला जाणाऱ्या मोनोरेलच्या दोन डब्यांना पहाटे 5 वाजता आग लागली.

म्हैसूर कॉलनीजवळ ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच अग्निशमल दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

आग विझवण्यात आल्यानंतर मोनोरेल कारखान्यात नेण्यात आली.

LEAVE A REPLY

*