आमदार निवासात सनी धरणार लावणीवर ठेका

0

मुंबई : सध्या सगळीकडे गणपतीचे वेध लागले असून गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. ठिकठिकाणी सेलिब्रेटीना निमंत्रण देण्याचं नियोजनही सुरु झालं आहे. पण आता आमदार निवासाला सनी लिओनीचे वेध लागले आहेत. कारणही तसंच आहे आमदार निवासात सनी सर्वाना वेड लावणाऱ्या शांताबाई या गाण्यावर नृत्य करणार आहे.

होय, आमदार निवास नावाच्या चित्रपटात निवास सनी झळकणार आहे. संजीव राठो़ड दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण अंधेरीमध्ये सुरु असल्याचं कळत आहे. दरम्यान, मराठी चित्रपटामध्ये सनी पुन्हा झळकणार असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

याआधी सनीना ‘बॉईज’ या चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. त्यामुळे आता आमदार निवासमध्ये कधी थिरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*