Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सिल्लोडचे माजी आमदार अब्दुल सत्तारही शिवबंधनात

Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट असह्य झाल्याने बाहेर पडलेले अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्री येथे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की “जो मतदारसंघ तुमचा आहे सिल्लोड, तो मला परत जिंकून द्यायची ही जबाबदारी तुमची आहे.” सत्तार यांनी कडवट शिवसैनिक म्हणून मला वचन दिलं आहे की ते आणि त्यांचे शिवसैनिक हे शिवसेना पक्षवाढीसाठी काम करतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान राजकीय पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले असून यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते युतीमध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे आघाडीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. औरंगाबाद येथील काँग्रेसचे माजी आमदार  अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले.

सिल्लोड या विधानसभा मतदारसंघातून सत्तार निवडून येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करत उद्धव यांनी सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली. इतकेच नाही, तर मराठवाड्यात अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचेही उद्धव म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!