Type to search

एमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण

Breaking News maharashtra टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

एमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण

Share

मुंबई : एमजी (मॉरिस गॅरेज) ने अलीकडेच आपल्या ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही एमजी इझेडएसचे जागतिक स्तरावर अनावरण केले आहे. जी आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत ही कार भारतात दाखल होणार असून ती देशातील पहिली ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

जे लोक पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू इच्छित आहेत, आणि त्यांना कनेक्टेड मोबिलिटी फीचर्ससहित अत्याधुनिक वाहनाची आकांक्षा आहे. अशांसाठी एमजी इझेडएस ही अगदी योग्य कार आहे. भारतातील लॉन्च नंतर ही कर युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि मध्य पूर्व देशांमध्ये देखील लॉन्च होणार आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवथापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, आधुनिक डिझाइन आणि प्रगत टेक्नॉलॉजीच्या बळावर एमजी इझेडएस भारतात पर्यावरण-मित्र सोल्युशन्सच्या बाबतीत एका नवीन प्रकरणाची अग्रदूत बनेल. ही गाडी लॉन्च होईल तोपर्यंत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या फेम २ (FAME II) योजनेअंतर्गत इलेक्टिक वेहिकलसाठी सब्सिडी जाहीर केलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. ज्यामुळे लोक पर्यावरण-अनुकूल अशी मोबिलिटी सोल्युशन्स विकत घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. इझेडएसची इतर मोजमापे आणि वैशिष्ट्ये मागाहून जाहीर करण्यात येतील.”

देशभरात १२० विक्री आणि सेवा आऊटलेटच्या जाळ्यासह एमजीचे लक्ष्य भारतीय ग्राहकांना वाहनाच्या मालकीचा सुलभ अनुभव मिळेल याची खातरजमा करण्याचा आहे. या व्यतिरिक्त एमजी भारतीय नागरिकांना इलेक्ट्रिक वेहिकल ड्रायव्हिंग श्रेणी बाबतच्या शंका दूर करण्यासाठी आणि चार्जिंगबाबत माहिती देण्यासाठी उपाययोजना करेल. इझेडएसमध्ये एमजीची आयस्मार्ट नेक्स्ट-जेन तंत्रज्ञान देखील असेल, जे भारतात या वर्षी जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणा-या एमजी हेक्टर एसयूव्हीमध्ये पहिल्यांदा आढळून येईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!