मुंबईच्या तिन्ही लोकलवर मेगाब्लॉक

0

मुंबई : मुंबईच्या तिन्हीही लोकल रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४:१० पर्यंत मेगाब्लॉक आहे.

दरम्यान दार रविवारी हा ब्लॉक घेण्यात येणार असून या मार्गावरील कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि बांद्रा दरम्यान हा मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गवारील लोकल फेऱ्या बंद राहतील. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन पनवेलसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान लोकल १५-२० मिनिटं उशिराने धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिन रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ या ब्लॉक काळात सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*