Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Share

मुंबई : मागील आठवड्यात गणेशोत्सवाची धामधूम असल्याने मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता. मात्र आज (दि. १५) मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. आज हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ११ ते ०४ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीचा आंनद घेण्यासाठी बाहेर पडण्याचा प्लॅन करणार असाल तर रेल्वे प्रवास करताना आजचं प्लॅनिंग रेल्वेचे हे वेळापत्रक पाहूनच करा.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर हार्बर वर वाशी-पनवेल मार्गावरील अप-डाऊन मार्गावर आणि माहिम- गोरेगाव मार्गावर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सध्या मुंबईत सकाळपासून पावसाचा जोरही कायम आहे.

कल्याण-ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर ११. २० ते ३.५० पर्यंत मेगाब्लॉक. कल्याण स्थानकातून सुटणार्‍या स्लो आणि सेमी फास्ट लोकल १०:४८ ते दुपारी ३:५१ यावेळेत फास्ट कल्याण-मुलुंड दरम्यान फास्ट लाईन वरून चालवण्यात येतील तर मुलुंड नंतर त्या पुन्हा स्लो ट्रॅकवर चालवणार आहेत. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरुन लोकल धावणार नाहीत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हाया ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकातून जाता येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!