धक्कादायक महाराष्ट्रात एचआयव्हीचे सर्वाधिक रुग्ण

0

मुंबई : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. देशभरामध्ये २१ लाख ४० हजार लोक एचआयव्ही बाधित असून यापैकी १५ टक्के म्हणजेच जवळपास सडे तीन लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

२००० सालातील एचआयव्ही बाधितांच्या तुलनेमध्ये यावर्षी ६० टक्के घट झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या सर्वात कमी आहे.

संपूर्ण जगाला एड्‌सचा विळखा करकचून आवळत असून भारतात महाराष्ट्रात एड्‌सचे सर्वाधिक रुग्ण असून यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

आंध्रमध्ये एचआयव्ही ग्रस्तांची संख्या 1.07 टक्के इतकी असून महाराष्ट्रात हेच प्रमाण 0.64 टक्के इतके होते. परंतु हेप्रमाणं वाढून महाराष्ट्रात ही संख्या वाढीस लागली आहे.

LEAVE A REPLY

*