Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

लवकरच सौरऊर्जेवर चालणारी कार बाजारात दाखल होणार

Share

मुंबई : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या वाहनांचा ट्रेंड आहे. तसेच वेगवेगळ्या फिचर असणरय वाहनांची सध्या चलती आहे. नुकतेच लाइटइयर या कार उत्पादक कंपनीने सोलर पॉवर वर चार्ज होणारी पहिली लॉन्ग रेंज कारचे प्रोटोटाइप सादर केले आहे. कंपनीने या गाडीला ‘लाइटइयर वन’ असे नाव दिले आहे.

दरम्यान या कंपनीने कारचा फिचर सांगितले ते असे कि, सूर्यप्रकाशात पूर्ण चार्ज केल्यावर ही गाडी तब्बल ७२५ किमी पर्यंत चालू शकेल. कंपनीने यामध्ये सोलर एनर्जी द्वारे चार्ज होणारी बॅटरी आणि टेक्नॉलॉजी वापरली आहे. त्याचबरोबर, ही गाडी विजेवरही चार्ज केली जाऊ शकणार आहे.

या कारच्या वरील छतावर ५ स्क्वेअर मीटर चे सोलर पॅनेल बसवले असून यावर संरक्षित काच लावलेली दिसून येते. कंपनीच्या मते, काच इतकी मजबूत आहे कि, त्यावर कोणी उभे राहिले तरी दाबण्याची शक्यता नाही. हे सोलर पॅनेल लाइटवेट असल्याने वेगवान शक्ती निर्माण करण्यास सक्षम आहेत.

१ तास बॅटरी चार्ज केल्यावर १२ कि.मी.चा प्रवास घडू शकतो. रात्रभर चार्जिंग केल्यास गी गाडी ४०० किमी पर्यंत धावू शकेल. महत्वाचे म्हणजे कार उन्हात चालवल्या जाईल तेव्हा कारमधील बॅटरीज आपोआप चार्ज होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!