Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबई : मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार; राज्य सरकारकडून ‘जलसंजाल’ योजनेची घोषणा

Share

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून यासाठी राज्य सरकारने १६ हजार कोटींची ‘जलसंजाल’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रमुख ११ धरण एकमेकांना जोडली जाणार आहेत.

दरम्यान यंदा मराठवाड्यात ४० टक्के पावसाची नोंद झाली असून जायकवाडी धरण ९३ टक्के भरले आहे. परंतु या योजनेमुळे दुष्काळ कमी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत प्रमुख धरणं जोडण्यासाठी हजारो किलोमीटरची बंद पाईपलाईन टाकण्यात येणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुविधांचाही यात समावेश असेल. जलसंजाल योजनेची पहिली निवादा आठवड्याभरात निघणार असून, पहिल्या टप्प्यात 4,527 कोटींच्या कामाचा समावेश आहे.

इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी या योजनेत सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. २०५० पर्यंतच्या पाण्याची गरज पाहून आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!