‘तांडव’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

0

मुंबई : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, मूळ बीडचे रहिवासी सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित ‘तांडव’ या मराठी सिनेमाचे पोस्टर अनघा अशोक सातवसे (पोलीस निरीक्षक, पवई) आणि प्रियांका तात्यासाहेब पाटील (पोलीस उपनिरीक्षक, पवई) यांच्या हस्ते प्रदर्शित

करण्यात आले.

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत मराठी चित्रपट फारसे प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीत. याच कथेवर आधारीत ‘तांडव’ या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. चित्रपटाची संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. उपस्थित अनघा अशोक सातवसे आणि प्रियांका तात्यासाहेब पाटील यावेळी म्हणाल्या की, ‘सिनेमा हे क्षेत्र प्रभावी माध्यम असून तांडव या सिनेमातून महिला सबलीकरणाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. महिलांच्या सर्वच क्षेत्रांतील उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु त्यावर आधारीत नायिकाप्रधान चित्रपट क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो’.

अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, सुप्रिया गावकर आणि सयाजी शिंदे  यांच्या तांडव या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक संतोष जाधव यांनी मागील अठरा वर्षांपासून सिनेमा या क्षेत्रात संकलन आणि दिग्दर्शन केले असल्यामुळे तांडव या सिनेमाचे दिग्दर्शन करण्यास त्यांना खूप मदत झाली. चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘तांडव या चित्रपटाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ  महिला पोलीस अधिकारीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगणारी अशी ही नायिका आहे. पुजा रायबागी हिने हि भूमिका खूप दमदार पद्धतीने साकारली आहे. सिनेमामध्ये तिचा संघर्ष सत्तेतील राजकारण्यांशी होतो. त्याचा ती कसा सामना करते यावर आधारीत चित्रपटाची कथा आहे’.

चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍक्शन आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची कथा सुभाष गणपतराव काकडे यांनी लिहिली आहे. तर पटकथा संवाद प्रशांत निगडे यांचे आहे. त्याचबरोबर रोहन पाटील, अशोक काजळे आणि नविन मोरे यांचे संगीत आहे

LEAVE A REPLY

*