Type to search

हिट-चाट

‘दे धक्का २’ मध्ये प्रेक्षकांना घडणार ‘लंडनवारी’

Share

मुंबई : आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल येत आहे.नुकात्कॅह या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

दे धक्कामध्ये मुंबईला निघालेल्या धनाजीच कुटुंब आपल्या म्हेव्हण्यासह लंडनला निघाला आहे. पोस्टरमध्ये ‘वेलकम टू लंडन’ असा बोर्ड हातात घेऊन एक महिला उभी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे यंदा दे धक्कातून प्रेक्षकांना लंडनवारी करणार अस;याचे दिसते आहे.

या चित्रपटात मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार दे धक्का २ ‘मध्येही असणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबरीनं आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘दे धक्का’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल येतोय म्हटल्यावर प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. ३ जानेवारीला ‘दे धक्का२’ प्रदर्शित होतोय.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!