Type to search

हिट-चाट

‘आलीया पोरींची बारी र’ म्हणत ‘गर्ल्स’चा ट्रेलर लाँच

Share

मुंबई : बहुचर्चित गर्ल्स सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. मुलींमधील गॉसिप लवकर माहित होत नाहीत, किंवा चर्चा गुलदस्त्यात असतात. तर या चर्चा गर्ल्स या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘गर्ल्स’ पाहिल्यानंतर हे ‘गर्ल्स टॉक’ प्रेक्षकांना नक्कीच समजणार आहे.

दरम्यान ‘बॉईज २’ सारख्या चित्रपटातून रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी उया सिनेमाचे दिगदर्शन केले आहे. विशाल देवरुखकर यांचा हा तिसरा सिनेमा असून मुलींच्या खासगी आणि बंदिस्त आयुष्याला या चित्रपटातून सर्वांसमोर आणले आहे.

‘आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, जग गेले तेल लावत’ असं म्हणणाऱ्या ‘गर्ल्स’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा रंगली होती.

या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत. येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!