मुंबईच्या मूकमोर्चेत राहत्यातुन 50 हजार मराठा बांधव सहभागी होणार

0

शिर्डी (शहर प्रतिनीधी)- 9 ऑगस्ट रोजी (क्रांतीदिनी) होणार्‍या मुंबईच्या मूकमोर्चात राहाता तालुक्यातून 50 हजार मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहीती तालुक्यातील आयोजकांनी दिली.

मुंबई येथे 9 ऑगस्ट, क्रांतिदिनी रोजी निघणार्‍या मराठा क्रांती महा मुकमोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक पार पडली असून या मुकमोर्चासाठी मुंबईला 50 हजार समाज बांधव जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती महा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजाची साकुरी येथील सिध्द संकल्प लॉन्स येथे  दि. 2 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक संजीव भोर यांनी मुंबईच्या मोर्चा संदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

*