मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक सुरू

0

जळगाव/ नाशिक ता. ८ : मुंबईत उद्या ९ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक आज सायंकाळपासून मुंबईत सुरू झाली आहे.

या बैठकील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांच्यासह अनेकांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

यावेळी जळगावहून प्रा. डी.डी. बच्छाव, सचिन सोमवंशी, किरण बच्छाव यांच्यासह ब्रिगेडियर ( नि ) सुधीर सावंत सहभागी झाले होते.

उद्या भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील आझाद मैदानापर्यंत हा विराट महामोर्चा निघणार आहे.

मुंबईतील हा मोर्चा रेकॉर्डब्रेक होणार असून यानिमित्ताने दक्षिण मुंबईतील शाळा, महाविद्यालये आणि आस्थापना बंद राहणार आहेत.

नाशिक शहर व जिल्ह्यासह मोर्चाला आज हजारो मराठा बांधव मुंबईला रवाना झालेत.

 

LEAVE A REPLY

*