फेसबुक, ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा ट्रेंडमध्ये; डोनाल्ड ट्रम्पनंतर मराठा मोर्चाचीच चर्चा

0
नाशिक । मराठा क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद आज (दि.9) मुंबईत मिळाला. मुंबईत गर्दीचा उच्चांक नोंदविला जाण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात होती. गर्दीचा उच्चांक जसजसा वाढत गेला. तसतसा सोशल माध्यमांमधूनदेखील या मोर्चाची चर्चा रंगत गेली.

ट्विटर, फेसबुकवर तर सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चा ट्रेंडमध्ये दिसून आला. विशेष म्हणजे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर ट्विटरमध्ये मराठा मोर्चाने स्थान मिळवले होते तर फेसबुकलादेखील हा ट्रेंड अग्रस्थानी दिसून आलेला होता. जगात चर्चिल्या जाणार्‍या सर्वाधिक घटनांमध्ये आज मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाने बाजी मारली होती.

मराठा मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले होते. तंत्रज्ञानाच्या  बदलत्या काळात संपर्काची प्रभावी माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामूळे ट्विटर, फेसबूकवर तर अनेकांनी घरातून निघाल्यापासून मुंबईत पोहोचेपर्यंतच्या सर्व अपडेटस् टप्याटप्याने दिल्या होत्या. अनेकांनी तर थेट(लाईव्ह) प्रसारण करून अनेकांची वाहवा मिळवली.

ट्रेंडमध्ये मुंबईच्या मोर्चाने दुसरा नंबर मिळवला होता. त्यामूळे जे मोर्चासाठी पोहोचू शकले नाहीत त्यांनी सोशल मीडियातून फोटो, व्हिडीओ शेअर करत मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. त्यामूळे सोशल मीडियावर फक्त मराठा मोर्चाचीच चर्चा दिसून येत होती.

ट्रेंड म्हणजे नेमकं : इंटरनेट जगात सर्वाधिक चर्चेत असणार्‍या घडामोडींची माहिती विशेष हॅशटॅगने (ञ्च्) पोस्ट केली जात असते. ट्विटर, फेसबूकवर, इन्स्टाग्रामवर असणार्‍या युझर्सला हा ट्रेंड लक्षात येतो. त्यानंतर तेही त्यावर प्रतिक्रीया देतात. त्यामूळे ही साखळी वाढतच राहते. आणि शेवटी ती एका विक्रमाकडे जाऊन त्यादिवसाची सर्वाधिक चर्चेत असणारी घटना ठरते. याआधी नाशिक कुंभमेळा,राष्ट्रपती निवडणूक क्रिकेट सामने इत्यादी घटना ट्रेंडमध्ये येत असतात.

सोशल मीडियातून मोर्चात सहभागी : परिक्षा तोंडावर आल्यामूळे मी मोर्चासाठी जाऊ शकलो नाही. मात्र सोशल मीडियातून अनेक पोस्ट शेअर केल्या, किंवा मोर्चाबाबत वाहनतळ, लोकलचा वेळ, रेल्वेचे वेळापत्रक, जेवनाचे ठिकाण आदी गोष्टी मी फेसबूक, ट्विटर तसेच व्हॉटस्अ‍ॅपच्या गु्रपमधून पाठवून ऑनलाईन मोर्चात सहभाग घेतला.
भुषण थोरात, ब्राह्मणगांव

LEAVE A REPLY

*