Gallery : मुंबई मराठा क्रांती मोर्चा, आझाद मैदान परिसर सकाळी १०.१५ ची स्थिती

0

मुंबई, ता ९ (भूषण चोभे) : मुंबई मराठा मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल येथे गर्दी वाढत आहे.

विशेषत: नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मोर्चेकरी बांधव येथे जमले आहेत.

स्टेशनबाहेरचा जीपीओ, बेस्ट बसस्थानक, बीएमसीचौक, आझाद मैदान चौक परिसर सकाळी १० पर्यंत गर्दीने फुलून गेल्याचे चित्र होते.

हा संपूर्ण परिसर आता भगवामय झाला आहे. अनेक जण अजूनही मोर्चास्थळी येत आहेत.

मुंबई महापालिकेच्या ए वार्डतर्फे मोर्चेकरी बांधवांच्या आरोग्यासाठी विशेष वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या ठिकाणी विविध पक्षांनी बॅनरही लावले आहेत.

LEAVE A REPLY

*