मुंबईत मराठा मोर्चाने मोडला गर्दीचा उच्चांक

0

नाशिक/ मुंबई ता. ९ : आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या मराठा मोर्चाने सर्व विक्रम मोडीत गर्दीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला.

सकाळी ११ पासून भायखळा येथील जिजामाता मैदानापासून सुरू झालेला मोर्चा दुपारी १ च्या सुमारास आझाद मैदान आणि परिसरात पोहोचला तेव्हा पाय ठेवायलाही जागा परिसरात शिल्लक राहिली नाही.

आझाद मैदानासह, सीएसटीएम चौकातही मराठा बांधवांची अभूतपूर्व गर्दी होती. त्यात महिला आणि तरुणांची संख्या लक्षणिय होती.

पहाटे पाचपासूनच आझाद मैदानावर गर्दीला सुरुवात झाली होती. बाहेरगावहून आलेल्या मराठा बांधवांच्या वाहनासाठीचे पार्कींग दहापूर्वीच भरून गेले. त्यामुळे पार्कींगसाठी दुसरी व्यवस्था करावी लागली. रेल्वेनेही हजारो बांधव मुंबईत दाखल झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसचा स्थानक भगवे झाले.

सकाळी एकदा आणि नंतर आझाद मैदानात मोर्चा पोचला तेव्हा वरूणराजाने हजेरी लावली मात्र तरीही मोर्चेकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

मोर्चेकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पाणी आणि अल्पोपहाराची सोय होती. तसेच वैद्यकीय पथकाही तैनात करण्यात आले होते.

मुंबईतील आजच्या महामोर्चापूर्वी गेले वर्षभरात राज्यात ठिकठिकाणी 58 मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यानंतरही मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार न झाल्याने आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईत महामोर्चा काढण्यात आला.

मोर्चकऱ्यांची शिस्त वाखणण्याजोगी होती. जे.जे हॉस्पिटलजवळ मोर्चादरम्यान आलेल्या रुग्णवाहिकेला मोर्चेकऱ्यांनी वाट देत माणुसकीचे दर्शन घडविले.

मराठा मोर्चाच्या गाड्याने पुणे मुंबई हायवे जाम

मोर्चा आझाद चौकात पोहोचल्यानंतर लगेचच सुमारे साडेतीन हजार स्वयंसेवकांनी मोर्चाचा मार्ग चकाचक केला.

सकाळी ११च्या सुमारास आझाद मैदानाच्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मोर्चेकऱ्यांनी प्रतिबंध केला. शेलार यांनी मात्र याचा इन्कार केला.

मोर्चाच्या ठिकाणी असलेले राजकीय पुढाऱ्यांचे बॅनरही मोर्चेकऱ्यांनी काढून टाकले.

ठिक १ च्या सुमारास मोर्चातील रणरागिणींनी निवेदन वाचण्यास आणि मोर्चेकऱ्यांच्या भावना मांडण्यास प्रारंभ केला. त्यावेळी आलेल्या पावसाचाही परिणाम मोर्चावर झाला नाही.

राज्य मंत्रिमंडळातर्फे शिष्टमंडळाला घेऊन जाण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख दुपारी मोर्चास्थळी आले होते. ते मोर्चकऱ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले.

दुपारी ठीक २.१६ वा. मराठा मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले. शिष्टमंडळातील ५ भगिनींनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

यावेळी त्यांच्यासोबत  शिवसंग्रामचे विनांयक मेटे, आ. अजित पवार, नितेश राणे, नरेंद्र पाटील आदी मंडळी हजर होती.

मुस्लिम बांधवांचे सहकार्य

  • एक हजार किलो बिर्यानी veg / non veg .
  • विविध ठिकाणी २०० वाहन मेकँनिकल .
  • विविध ठिकाणी लाखो लिटर पाणी वाटप .
  • ५० ठिकाणी तद्म डॉक्टर टिम  व रूग्णवाहिका .
  • ५० किलोमीटर परिसरात दिशादर्शक बँनर .
  • १० ठिकाणी दोन लाख  वडापाव वाटप केंद्र .
  • 🚩 ठाणे , पनवेल व नवी मुंबई मधील अनेक मदरसा मध्ये स्नान व विश्रांतीची सोय . राज्यातील ५८ मोर्चा मध्ये ही मुस्लिम बांधवानी अनेक प्रकारे सहयोग दिला आहे

LEAVE A REPLY

*