कोपरगावातील हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना!

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई येथे होणारा विराट मोर्चासाठी कोपरगाव तालुक्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते रवाना झाले. भगवे झेंडे व खाजगी वाहनांभोवती बॅनर अशा शेकडो गाड्या रस्त्यारस्त्याने सजल्या होत्या. सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी यापूर्वी मोठे आंदोलन झाले. त्यासाठी कोपरगावनंतर नगरला विराट मोर्चा निघाला. याच प्रश्नांसाठी कोपरगावातून सकल मराठा समाजातील कार्यकर्ते एक झाले असून शहर तसेच तालुक्यातून मुंबईला जाण्यासाठी नियोजन करण्यात आले.
त्यासाठी कारखान्यांची मदत घेण्यात आली आहे. मंगळवारीच येथून 20 गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या तर 100 गाड्या या बुधवारी मोर्चाचे दिवशी मुंबईला धडकणार आहेत. तर काही कार्यकर्ते शिर्डी येथून निघणार्‍या शिर्डी मुंबई या रेल्वेने रात्री निघाले आहेत. हा मोर्चा शांततेने निघावा यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबई येथे शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जमा होणार आहेत.
सकल मराठा समाजाचे नेते बाळासाहेब आढाव, विजयराव आढाव, वैभव आढाव, नगरसेवक स्वप्निल निखाडे, अ‍ॅड. योगेश खालकर, अशोक आव्हाटे, सुधाकर पाटील, योगेश नरोडे, शुभम काळे, दिनेश पवार आदी प्रमुख कार्यकर्ते मोर्चाच्या नियोजनात गुंतले होते. या मोर्चा अगोदर कोपरगावातून मोटर सायकल रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात आली.

LEAVE A REPLY

*