मराठ्यांचा ऐतिहासिक एल्गार

0

मुंबईत तयारी पूणर्र्, सर्वपक्षीय नेते सहभागी होणार; राज्यातून समाज एकवटणार

मुंबई – एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत आज 9 ऑगस्ट रोजी मुंबईत ऐतिहासिक मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकर्‍यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली गेली आहे. मराठा आरक्षण, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा, मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी हा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात राज्यातून सुमारे 25 लाखांवर मराठा समाज सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. विविध संघटना, पक्षांनी या मोर्चाला पाठींबा दिला असून सर्वपक्षीय नेते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, शांततेच्या मार्गाने निघाणार्‍या या मोर्चाची दखल राज्य शासनाकडून घेतली जात आहे, असेच दिसते आहे.

ही महिला करणार मोर्चाचं नेतृत्व- मराठा मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. वंदनाताई या जिजाऊच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत.

महापालिकेची जय्यत तयारी – मुंबईत ठिकठिकाणी 8 आरोग्य कक्ष, प्रत्येक ठिकाणी 10 महिला व 10 पुरुष डॉक्टर, आझाद मैदानाचे प्रवेशद्वार 40 फुटांपर्यंत मोठे करण्यात आले आहे. आझाद मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, फिरती शौचालये, 10 महिलांसाठी, 10 पुरुषांसाठी फायर इंजिन्सची व्यवस्था, आझाद मैदानावर गर्दी झाल्यास, बॉम्बे जिमखान्याचे मैदानही खुले करणार, ओसिएस वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा चौकापर्यंत भक्कम बॅरेकेटिंग करण्यात आले आहे.

तसेच दक्षिण आणि मध्य मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे. मोर्चामध्ये मुंबईतले डबेवाले सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईकरांना डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे. एकूण 5000 डबेवाल्यांचा मोर्चात सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

मोर्चादरम्यान मुंबईतील वाहतूक सुरळीत रहावी तसेच अन्य विपरीत गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक मार्गांत तात्पुरत्या स्वरूपाचे बदल कऱण्याच आले आहेत. दरम्यान, मराठा मोर्चा लक्षणीय व्हावा, म्हणून शिवाजी मंदिरात एक हजार लोकांसाठी स्पेशल वॉर रूम तयार करण्यात आली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चासाठी एक संहिता तयार करण्यात आली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान शिवसेनेकडून मराठा मार्चाला पाठिंबा जाहरी करण्यात आला आहे.

मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा- मराठा आरक्षणाला थेट पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय. फेसबुकवर पाठिंब्याची पोस्ट टाकण्यात आलीय. बलुचिस्तानमध्ये असलेल्या ारीरींहर ींीळलशने मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा दिला आहे. मराठा ट्राईबच्या फेसबुक पेजवर पाठिंबा देणारी पोस्ट टाकण्यात आली आहे.

मोर्चात राजकीय भाषणे होणार नाही – राणे  : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील. मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. राजकीय पुढारी जरी यामध्ये सहभागी झाले तरी तिथे कुठल्याही नेत्याला भाषण करता येणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुलामुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं, या मागण्यांसाठी मुंबईतून भव्य मोर्चा निघेल. या मोर्चातील एका शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. शिष्टमंडळाच्या या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य उपचार करतील, अशी आशा असल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत. मंगळवारी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

विधानपरिषदेत विरोधक आक्रमक – मराठा समाजाला आरक्षण द्या, नुसत्या चर्चा नको अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराचा तास रोखून धरला. विरोधी सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी 20 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. विधानपरिषदेत सभागृह सुरू होताच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 9 ऑगस्टला मुंबईत होत असलेल्या मराठा मोर्चाकडे लक्ष वेधून घेत सत्ताधारी पक्षाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर आधी चर्चा करा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 2014 च्या हिवाळी अधिवेशनापासून सातत्याने विविध मार्गांनी सभागृहात विषय उपस्थित केला जात आहे. मराठा समाज सातत्याने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात्मक भूमिका घेत आहे. या विषयावर चर्चा खूप झाल्या. नुसत्या चर्चा नको तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा अशी मागणी करत प्रश्नोत्तराचा तास रोखून धरला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेत चर्चा नको, आरक्षण द्या अशी मागणी लावून धरली. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सभापतींनी सभागृहाच कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले.

 नगरसाठी पार्किंगची व्यवस्था –  अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातून येणार्‍या मराठा क्रांती मोर्चेकरांना, नवी मुंबईतून मुंबईत जावे लागणार आहे. नवी मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर आहे. मुंबई -पुणे महामार्गाला लागून सर्व रेल्वे स्टेशन आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या समोरील मैदानात वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याला रेल्वे स्थानके वाटून देण्यात आली आहेत.  पुणे, सोलापूर – खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान, अहमदनगर – खांदेश्वर रेल्वे स्थानक औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांतूनही मोर्चासाठी मुंबईत अनेक मराठा बांधव येणार आहेत. अहमदनगरकडून येणार्‍या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत, कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिककडून येणार्‍या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

रिपाइंचा पाठिंबा ; आठवले –  मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजीच्या क्रांती मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले.  मराठासह देशातील गुर्जर, जाट, लिंगायत ब्राह्मण आदी उच्च वर्णीय जातींतील आर्थिकदृष्ट्या मागासांना संसदेत कायदा करून 25 टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी राज्यघटनेत संशोधन करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून वाढवून 75 टक्क्ंयांपर्यंत करावी अशी मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ना. रामदास आठवले यांनी केली आहे. संसदेत आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा कायदा झाल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असे आठवले म्हणाले . मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सांगून अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटके विमुक्त या कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र कॅटेगरीत आरक्षण मिळावे या मराठा अमाजाने घेतलेल्या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपण सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असल्याची आठवण ना. रामदास आठवले यांनी करून दिली.

LEAVE A REPLY

*