Type to search

Breaking News मार्केट बझ मुख्य बातम्या

मारुती सुझुकीच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत पाच हजारांनी घट

Share

नवी दिल्ली : नवीन कार खरेदीदारांसाठी चांगली बातमी असून आजपासून मारुती सुझुकीच्या किमतीत घट होणार आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुतीने आपल्या अनेक वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने बुधवारी जाहीर केले की काही निवडक मॉडेल्सच्या किंमतीत ५ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

दरम्यान मारुती सुझुकीने ज्या मॉडेलच्या किंमती कमी केल्या आहेत त्यामध्ये ऑल्टो ८००, ऑल्टो के १०, स्विफ्ट डिझेल, सेलेरिओ, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेझा आणि एस-क्रॉसचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त कंपनीच्या इतर कारची किंमत आणि पेट्रोल गाड्या असणाऱ्या डिजायर, स्विफ्ट आणि बालेनोच्या मॉडेलमध्ये घट झाली नाही. कॉर्पोरेट कर कपातीमुळे मारुतीने आपल्या कारची किंमत कमी केली आहे.

मारुतीच्या मते, कंपनीच्या वाहनांवर सध्या उपलब्ध असलेल्या प्रमोशनल ऑफर्सपेक्षा या किंमतीतील कपात वेगळी आहे. कंपनीची आशा आहे की आपल्या कारच्या किंमती कमी झाल्यास एन्ट्री-स्तरीय ग्राहकांना कार खरेदी करणे स्वस्त होईल. या निर्णयामुळे उत्सवाच्या हंगामात ग्राहकांची भावना मजबूत होईल आणि वाहनांची मागणी वाढेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!