Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मंत्रालयात पदवीधर झाले वेटर; ७ हजार मधून १३ जणांची निवड

Share

मुंबई : मंत्रालय कॅंटीनमध्ये वाढपी या पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली असून, या १३ जागांसाठी तब्बल सात हजार अर्ज आले होते. हजारोच्या संख्येतून केवळ १३ जणांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

वाढपी पदासाठी चौथी पास पात्रता असताना या पदासाठी बहुतांश उमेदवार हे पदवीधर होते. त्यामुळे या परीक्षेची गुणवत्ता १०० पैकी ९६ वर पोहचली.

बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पदासाठी चक्क पदवीधर मोठ्या प्रमाणात अर्ज करीत आहेत. राज्यात मंत्रालय, विधानभवन, कोकण भवन, मंत्रालयासमोरील प्रशासकीय भवन या ठिकाणी एकूण सात सरकारी कॅंटीन असून, त्यामध्ये एकूण सध्या 275 कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्याच वर्षी या कॅंटीनमधील रिक्त १३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या १३ जागांसाठी राज्यातील विविध भागातील सुमारे ०७ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ हजार ६०० उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली.

या साठी १०० गुणांची परिक्षा घेण्यात आली. यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता ही ९६ ठेवावी लागल्याने ९६ ते ९० गुण मिळवणा-या १३ उमेदवारांची वाढपी पदासाठी निवड करण्यात आली असून, यामध्ये बहुतांश उमेदवार हे पदवीधर आहेत. मंत्रालय, विधानभवन, कोकण भवन आणि प्रशासकीय भवनातील सरकारी कॅंटीन मधिल वाढप्यांना कालांतराने सहाय्यक मॅनेजर पदावर बढती मिळते.

वाढपी हे पद ड वर्गातील असून ते सरळसेवेने भरले जाते. कॅंटीनमधील वाढपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मासिक २५ ते ३० हजाराच्या दरम्यान पगार मिळतो. त्यामुळे पदवीधरांचे मोठ्या संख्येने अर्ज आल्याचे सांगण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!